
ओमान-मस्कत दि.21- डाॅ. ऋषीकेश कांबळे यांचे मस्कत येथे प्रतिपादन. जो जात-धर्म आणि देशांच्या सीमा मानतो तो आंबेडकरवादी असूच शकत नाही. तथागतबुध्द आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा मानवतावाद हा पाया आहे त्यामुळे सच्चा आंबेडकरवादी जात-धर्म आणि देशांच्या सीमा मानता नाही मानवतावाद हीच त्याची खरी ओळख आहे, आणि जो या ओझ्याखाली असतो, तो आंबेडकरवादी असूच शकत नाही असे प्रतिपादन फुले-आंबेडकरी तत्वज्ञानाचे भाष्यकार डाॅ. ऋषीकेश कांबळे यांनी केले.